RTE Admission 2024-25 Maharashtra – असा भरा RTE ऑनलाईन फॉर्म

RTE Admission 2024-25 Maharashtra: बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. याद्वारे वंचित ,दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या जातात. बालकाला RTE अंतर्गत प्रवेश घ्यायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्याची प्रोसेस कशी असते याची सविस्तर माहिती आपण पाहूया.

RTE Admission 2024-25 Maharashtra

 

  1. RTE काय आहे
  2. RTE द्वारे प्रवेश कसा घ्यावा
  3. पात्रता
  4. कागदपत्रे
  5. वयोमर्यादा
  6. फॉर्म कसा भरावा

#1. आर.टी.ई. काय आहे 

RTE Admission 2024-25 Maharashtra: RTE अंतर्गत वंचित ,दुर्बल सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकातील जे मुल आहेत त्यांना RTE २५ टक्के च्या अंतर्गत १ ते ३ किलोमीटर च्या अंतरावर अनुदानित शाळा ,शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य शाळा व स्वयं अर्थ्साहाय्यीत शाळा अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो .या मध्ये खालील शाळांचा समावेश केला जातो.

  • माहानगरपालिका शाळा
  • नगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत शाळा
  • कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
  • महानगरपालिका शाळा स्वयंअर्थ्साहायीत
  • खाजगी अनुदानित शाळा
  • शाळा स्वयंअर्थ्साहायीत

#3. RTE द्वारे प्रवेश कसा घ्यावा

RTE Admission 2024-25 Maharashtra

  • सर्व प्रथम मुलांचा RTE पोर्टल वर ऑनलाईन फॉर्म भरून ध्यावा लागतो.
  • बालकाचे अनेक अर्ज भरू नये फक्त एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरल्यास बालकाचा प्रवेश रद्द केला जातो.
  • ऑनलाईन पद्धतीने लॉटरी लागते याची सूचना पालकांना SMS द्वारे दिली जाते.
  • नंतर आर.टी.ई. पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने यादी जाहीर केली जाते याची सूचना विद्यार्थाना SMS द्वारे पाठवली जाते.
  • काही विद्यार्थी प्रतीक्षा यादी मध्ये असतात.
  • जे विध्यार्थी पात्र आहेत त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाते .
  • त्यानंतर विध्यार्थाला प्रवेश दिला जातो .

असे सुरु करा आपले सरकार सेवा केंद्र 👉🏻 https://marathisupport.com/aaple-sarkar-seva-kendra-registration/

#4. पात्रता 

  • विथार्थी महाराष्ट्रातील रहिवासी हवा
  • १ ते ३ किलोमीटर पर्यंत क्षेत्रात शाळा असावी
  • पालकाचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे
  • सर्व कागदपत्रे मुळ प्रतीत असावी
  • अगोदर आर.टी.ई. अंतर्गत प्रेवश घेतला असेल तर परत घेता येणार नाही

#5. कागदपत्रे 

  • जात प्रमाणपत्र ( वडिलाचे /बालकांचे )
  • बालकाचे आधार कार्ड ,
  • बालकाचा जन्म दाखला ( ग्रामपंचायत/न.पा./म.न.पा./अंगणवाडी/बालवाडी – दाखला)
  • रहिवासी दाखला ( रेशन कार्ड / ड्रायविंग लायसन्स /टेलिफोन बिल/आधार कार्ड/मतदान कार्ड/पासपोर्ट )
  • विधवा महिला (असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र )
  • आर्थिक दृष्ट्या दुर्वळ असल्यास उत्पन्नाचा दाखला
  • अनाथ दाखला ( अनाथालयाची / बालसुधार गृहाची कागदपत्रे )
  • दिव्यांग प्रमाणपत्र ( ४० %  किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे प्रमाणपत्र )

#6. वयोमर्यादा 

अ. क्रप्रवेशाचा वर्ग          वयोमर्यादा दि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे किमान   वयदि ३१ डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय
1.प्ले ग्रुप / नर्सरी1 जुलै 2020 – 31 डिसेंबर 2021 3 वर्ष 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
2.ज्युनियर केजी1 जुलै 2019 – 31 डिसेंबर 2020 4 वर्ष 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
3.सिनियर केजी1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 2019 5 वर्ष 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
4.इयत्ता १ ली1 जुलै 2017  – 31 डिसेंबर 2018 6 वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस

 

#7. फॉर्म कसा भरावा 

RTE Admission 2024-25 Maharashtra: फॉर्म Online भरावा लागतो.  त्यासाठी सर्व माहिती खालील प्रमाणे .

ऑनलाईन अर्ज लिंक : apply online 

शेवटची तारीख : ३०-०४-२०२४

 

Leave a Comment