Aaple Sarkar Seva Kendra Registration – आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे

Aaple Sarkar Seva Kendra Registration: आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कि आपले सरकार सेवा केंद्र/सेतू कसे सुरु करावे. आपले सरकार सेवा केंद्र ची स्थापना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार झाली आहे. सेतू केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता असणार कोणकोणती कागदपत्रे लागणार.अर्ज कसा करावा लागतो व या आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराची एक नवी संधी मिळेल व याव्दारे तुम्ही लोकांची सेवा करून चांगले पैसे कमवू शकता . या मधून तुम्ही शासकीय कामे,शासकीय प्रमाणपत्रे  व आणखी बरेच कामे करू शकता. आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे याची सर्व माहिती पाहूया.

Aaple Sarkar Seva Kendra Registration

  1. सेतू केंद्र कसे सुरु करावे
  2. आवश्यक कागदपत्रे
  3. पात्रता
  4. साहित्य
  5. कोणकोणती  कामे करू शकतो

#1. सेतू केंद्र कसे सुरु करावे 

Aaple Sarkar Seva Kendra Registration: सर्व प्रथम आपण सेतू केंद्र  किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र हे सर्व एकाच अर्थाने वापरली जाणारे वेगवेगळी नावे आहेत म्हणजे एकच सेंटर परंतु नाव अनेक आहेत .

आपले सरकार सेवा केंद्र ची कामे स्वतः सुधा करू शकता त्यासाठी नागरिक लॉगइन देण्यात आले आहे . त्यासाठी या लिंक व क्लीक करा – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

Aaple Sarkar Seva Kendra Registration

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी एक प्रोसेस असते या त्यानुसार तुम्ही हे सेंटर किंवा दुकान सुरु करू शकता व शासकीय कामे करू शकता .

  • सर्व प्रथम तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत किंवा जिल्हा सेतू समिती मार्फत जागा काढल्या जातात .
  • जिल्हा प्रशासन या जागांची वर्तमान पत्र किंवा ऑनलाईन जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
  • जिल्हाची वेबसाईट पाहण्यासाठी तुमच्या जिल्हाचे नाव नंतर .gov.in किंवा  .nic.in टाका लगेच वेबसाईट येईल. Ex. buldhana.nic.in , pune.gov.in 
  • जाहिरात हि गावानुसार दिले जाते . प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या नुसार जागा निघते.
  • त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागीवले जातात .
  • उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले जाते व काही ठिकाणी मुलाखत घेतली जाते . ( CSC चालक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर प्राधान्य दिले जाते . )
  • जे उमेदवार पात्र आहेत त्यांची शिक्षणा नुसार यादी प्रसिद्ध केली जाते
  • पात्र उमेदवारांना सेतू किंवा आपले सरकार केंद्र दिले जाते .
  • सेतू भेटणे म्हणजेच Maha Online ID दिला जातो त्याला VLE ID सुधा म्हणतात .

#2.आवश्यक कागदपत्रे 

Aaple Sarkar Seva Kendra Registration

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • १० वी किंवा 12 वी मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  • संगणक प्रमाणपत्र /MSCIT
  • सीएससी प्रमाणपत्र ( असल्यास )
  • सेंटर आतील बाहेरील फोटो ( लोकेशन सह )
  • भाडे करार ( जागा भाड्याने असेल तर )

#3. पात्रता  

  • उमेदवार ज्या गावात जागा निघाली असेल तेथील रहिवासी असावा . तेथील उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल .
  • उमेदवार शासकीय कर्मचारी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र .
  • उमेदवार १० वी उतीर्ण असावा.
  • उमेदवाराकडे १० x १० sq जागा असावी. ( मालकीची अथवा भाडेपट्याची )
  • उमेदवाराकडे च्यारीत्र्य प्रमाणपत्र असेन आवश्यक .
  • शॉप ॲक्ट लायसेन्स किंवा ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र .

 

#4. साहित्य 

  • कॉम्पुटर / लॅपटॉप
  • बायोमेट्रिक डिव्हाइसेस
  • प्रिंटर
  • स्कॅनर
  • कॅमेरा

#5. कोणकोणती कामे करू शकता 

Aaple Sarkar Seva Kendra Registration: या मधून आपण शासकीय प्रमाणपत्र काढू शकतो . नैसर्गिक आपत्ती आधार प्रमाणीकरण करू शकतो .पिक विमा भरणे ,फॉर्म भरणे, अश्या प्रकारची विविध कामे करू शकता . तसेच शासकीय प्रमाणपत्रे काढू शकता . प्रमाणपत्रे थोडक्यात पाहू.

  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वय, अधिवास प्रमाणपत्र
  • भूमिहीन प्रमाणपत्र
  • अल्प भूधारक प्रमाणपत्र
  • शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  • सातबारा उतारा
  • लायसंस
  • रेशन कार्ड
  • पत दाखला प्रमाणपत्र

अश्या पद्धतीचे भरपूर प्रमाणपत्रे तसेच कामे  या द्वारे करू शकता .

 

 

1 thought on “Aaple Sarkar Seva Kendra Registration – आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे”

Leave a Comment